शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याही यापुढे आत्महत्या सारखा पर्याय शिल्लक

शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याही यापुढे आत्महत्या सारखा पर्याय शिल्लक

*कोकण Express*

*शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याही यापुढे आत्महत्या सारखा पर्याय शिल्लक…*

*मत्स्यदुष्काळ घोषित करून उभारी देण्याकामी आर्थिक सहकार्य करा…*

*आमदार नितेश राणे यांच्याकडे जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघटनेची मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ, परराज्यातील नौकांकडून होत असलेली मासळीची लुट व त्यातच हायस्पीड परप्रांतीय व स्थानिक नौकांकडून होत असलेली प्रकाशझोतातील मासेमारीमुळे ऐन हंगामात थव्यांची मासळी येणे आमच्या किनारपट्टीवर दुरापास्त झालेने रापण व्यवसाय डबघाईस आलेला असून शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याहीपुढे ‘आत्महत्ये’ सारखा पर्याय शिल्लक राहिला आहे.अधिवेशनात सरकारने गांभीर्याने आमच्या समस्यांचे निराकरण करुन ‘मत्स्यदुष्काळ’ घोषित करुन मालवण, देवगड व वेंगुर्ला या तालुक्यातील रापण संघांना उभारी देण्याकामी आर्थिक सहकार्य घोषित करावे, अशी मागणी जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघ यांच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा रापण संघाच्यावतीने तालुक्यातील रापण संघ आपल्या निदर्शनास आणून देतो की, सन २०१६ ते आजमितीस आमच्या तालुक्यातील सगळे रापण संघ ‘मत्स्यदुष्काळाच्या’ खाईत लोटले असून रापण व्यवसायावर अवलंबित सदस्यांच्या कुटुंबियांची उपासमार चालू आहे. मागील सरकारने आपत्कालीनदृष्टीन थोडीफार मदत केली, पण ३ वर्षात किनारपट्टीवर खांडवी मासळी येत नसल्याने, हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ, परराज्यातील नौकांकडून होत असलेली मासळीची लुट व त्यातच हायस्पीड परप्रांतीय व स्थानिक नौकांकडून होत असलेली प्रकाशझोतातील मासेमारीमुळे ऐन हंगामात थव्यांची मासळी येणे आमच्या किनारपट्टीवर दुरापास्त झालेने रापण व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यामुळे त्यावर उपजिवीका साधणाऱ्या हजारो कुटुबियांची उपासमार होत असल्याने शेतकऱ्यांप्रमाणे आमच्याहीपुढे ‘आत्महत्ये’ सारखा पर्याय शिल्लक राहिला आहे. सत्वर प्रशासनाला आमची विनंती आहे की, सद्यस्थितीचा अहवाल घ्यावा व ‘मत्स्यदुष्काळजन्य’ स्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. तसेच मोठ्या चालू अधिवेशनात सरकारने गांभीर्याने आमच्या समस्यांचे निराकरण करुन ‘मत्स्यदुष्काळ’ घोषित करुन मालवण, देवगड व वेंगुर्ला या तालुक्यातील रापण संघांना उभारी देण्याकामी आर्थिक सहकार्य घोषित करावे, अशी मागणी जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघ यांच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!