*कोकण Express*
*शिवसेना हरकुळ बु. विभागप्रमुख पदी मंगेश सावंत तर उपविभागप्रमुख पदी नित्यानंद चिंदरकर यांची नेमणूक*
*आ.वैभव नाईक, सतीश सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देत केले अभिनंदन*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हरकुळ बु. विभागप्रमुख पदी बंड्या रासम हे पूर्वी कार्यरत होते. मात्र नुकत्याच झालेल्या शिवसेना पक्षीय बैठकीत बंड्या रासम यांनी आपल्याला जिल्हा बँकेत कायम स्वरूपी नोकरी मिळणार असल्याने त्यांनी शिवसेना विभागप्रमुखपदी काम करण्यास असमर्थता दर्शविली असल्याकारणाने त्यांच्या जागी हरकुळ बु. विभागप्रमुख पदी मंगेश सावंत ( माजी पंचायत समिती सदस्य ) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर हरकुळ बु. उपविभागप्रमुख पदी नित्यानंद चिंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख आ. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर दारिस्ते शाखा प्रमुख पदी पूर्वी कार्यरत असलेले बंड्या सावंत यांनी आपल्या घरगुती करणास्तव पदावर काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने त्यांच्या जागी दारिस्ते शाखा प्रमुख पदी अविनाश गावकर यांची निवड करण्यात आली. तर युवासेना उप तालुकाप्रमुख (हरकुळ, नाटळ) पदी राजू पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,रामू विखाळे, हर्षद गावडे,रुपेश आमडोसकर, बंडू ठाकूर, महेंद्र डिचोलकर, बेनी डिसोझा, फैयाज खान, उत्तम लोके, भालचंद्र दळवी, अमोल राणे, काका राणे आदी उपस्थित होते.