*कोकण Express*
*जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या गंभीर आजारानी ग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेस पाठवू नये*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील परिवहन मंडळातील मधुमेह,ब्लडप्रेशर इत्यादी गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेस पाठवू नये अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग च्या ६३ कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली असून, जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे मत शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी व्यक्त केले असून, कर्मचाऱ्यांची कौटुंबिक अडचण तसेच कर्मचाऱ्याला मधुमेह, ब्लडप्रेशर, व इतर गंभीर आजार असल्यास त्या कर्मचाऱ्याला बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात येऊ नये अशी मागणी देखील त्यांनी निवेदनाद्वारे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. तसेच बेस्टच्या सेवेत गेलेल्या इतर विभागांना वगळण्यात आले असून, सिंधुदुर्ग विभाग मात्र अजूनही सेवा देत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम स्थानिक वाहतुकीवर होत असून, शालेय मुलांची व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यावर देखील त्यानी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.