*कोकण Express*
*मानव साधन विकास संस्थेच्यावतिने परीवर्तन केन्द्रामार्फत वेंगुर्लेत ४० शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप*
मा. सुरेश प्रभु यांनी स्थापन केलेल्या व विद्यमान अध्यक्ष सौ.उमा प्रभु असलेल्या मानव साधन विकास संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्याना मोफत चष्मा वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ला ग्रामिण रुग्णालय येथे करण्यात आले होते. वेंगुर्ले तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी सिव्हील हॉस्पिटलतर्फे करणेत आली होती. या तपासणीत ५३ विद्यार्थ्याना नेत्र दोष मिळाला होता, त्या सर्व विद्यार्थ्याना परीवर्तन केंद्रामार्फत सौ. उमा प्रभु यांच्या सहकार्याने मोफत चष्मा वाटप करण्यात आले .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २२००० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी सिव्हील हॉस्पिटलकडुन करणेत आली , त्यातील ७५० नेत्र दोष असलेल्या विद्यार्थ्याना मानव साधन विकास संस्थेमार्फत मोफत चष्म्याचे वाटप करणे आले.
परीवर्तन केंद्रामार्फत वर्षभरापुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महीलांना १०० स्थानिक संस्थाचे मार्फत १००० मोफत शिलाई मशिनचे वाटप करणे आले होते , तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११४ शाळातील १००० मुलीना मोफत सायकल वाटप करणे आले होते.
नेत्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी योग्यवेळी केल्याने व त्यांच्या असलेल्या नेत्र दोषाप्रमाणे, त्यांना योग्य चष्मा मिळाल्याने व त्यांचा योग्य वापर मुलांनी केल्यास त्यांना आलेला नेत्रदोष आगामी काळात दुर होऊ शकतो, तसेच नेत्र दोष दुर झाल्याने त्यांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते , असे प्रतिपादन काॅनबॅकचे मोहन होडावडेकर यांनी चष्मा वितरण कार्यक्रम प्रसंगी केले .
यावेळी परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर , भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , ग्रामीण रुग्णालयाच्या डीसोझा सिस्टर , या.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , बुथप्रमुख शेखर काणेकर , युवा मोर्चाचे दशरथ गडेकर , सामाजिक कार्यकर्ते राजु सामंत तसेच वेंगुर्ले तालुक्यातील विद्यार्थी व पालक व शिक्षक उपस्थित होते.