*कोकण Express*
*10 वी 12 वीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याच्या तारखा जाहीर*
*सिंधुदुर्ग:*
10 वी व 12 वीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या आहे. सदर अर्ज हे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
माध्यमिक शाळांनी नियमीत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र बुधवार दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 पर्यंत भरावयाची आहेत. तर पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसणारे विद्यार्थ्यांचे फॉर्म मंगळवार दिनांक 12 जानेवारी 2021 ते सोमवार दिनांक 25 जानेवारी 2021 रोजीपर्यंत भरावयाचे आहेत. तर माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा या बुधवार दिनांक 23 डिसेंबर 2020 ते सोमवार दिनांक 1 फेब्रुवारी 2021 पर्यंत या आहेत.
या कालावधीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून सादर केल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या लॉगिनमधून प्रि-लिस्ट उपलब्ध करून त्याची प्रिंट काढून जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार तपासून, प्रि-लिस्टबाबत विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर प्रि-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात सादर करावयाची आहे. माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजीपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रि-लिस्ट जमा करावयाची आहे. 10 वी चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज माध्यमिक शाळांमार्फत भरावे.
अर्ज भरताना माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी पुढीलबाबी विचारात घ्यावयाच्या आहेत. कोविड – 19 च्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन व्हावे, फॉर्म स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे गरचेचे आहे व सदर सरल डाटा वरुनच नियमित विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावयाचे आहेत. पुनर्परीक्षार्थी, यापूर्वा नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसणारे विद्यार्थी यांची माहिती सरल डाटा मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाईनच भरावयाचे आहेत. कौशल्य सेतु अभियानाचे ट्रान्स्फर ऑफ सर्टिफिकेट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन अर्ज भरून विषयासमोर ट्रान्स्फर ऑफ सर्टिफिकेटची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलीत पद्धतीने आवेदन पत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्डकॉपी विभागीय मंडळात जमा करावी.
सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलित शुल्क, मंडळांने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून, चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे. यावर्षी नव्याने फॉर्म नं.17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची सन 2021 मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जणार असल्याने या कालावधीत सदर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू नयेत. शाळांनी परीक्षा शुल्क, संगणकीय चलन डाऊनलोड करून, चलनावरील नमुद मंडळाच्या व्हर्च्युअल अकौंटमधअये एनईएफटी, आरटीजीएस द्वारे वर्ग करावे, माध्यमिक शाळांनी एनईएफटी, आरटीजीएस द्वारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही, तसेच अकौंट नंबर व आयएफएससी कोट चुकीचा नमुद केला गेल्यास सदरची रक्कम परत क्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील. सन 2021 मधील परीक्षेसाठी मार्च 2020 अथवा नोव्हेंबर – डिसेंबर 2020 मधील परीक्षेमध्ये एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आवेगनपत्र भरून परीक्षेस बसता येणार आहे. त्यामुळए त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांस श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस बसता येणार नाही, असे डॉ. अशोक भोसले सचिव राज्य मंडळ, पुणे हे कळवितात.