*कोकण Express*
*जम्मू-कश्मीरमध्ये एल.ओ.सी.(L.O.C.) वर हिमस्खलन, लष्कराचे ३ जवान शहीद*
*महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण*
जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल सेक्टरमध्ये रात्री हिमस्खलनाच्या तावडीत सापडल्याने लष्कराचे तीन जवान शहीद झाले.
तिघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत असताना ही दुर्घटना घडली.
अचानक झालेल्या हिमस्थलनाखाली तिन्ही जवान बर्फाखाली दबले गेले आणि यात त्यांचा मृत्यू झाला,
अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल इमरॉन मुसावी यांनी दिली आहे.
नाईक मनोज लक्ष्मणराव गायकवाड लान्सनाईक मुकेश कुमार आणि गनर सौविक हाजरा अशी हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. तर दोन जवानांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर कुपडावा येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कुपवाडामध्ये हिमस्थलनामध्ये शहीद झालेले ४१ वर्षीय नाईक मनोज लक्ष्मणराव गायकवाड
हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील चिंचखेडे येथील रहिवासी होते.
२००२ मध्ये लष्करामध्ये भरती झाले होते.
लान्सनाईक मुकेश कुमार हे २२ वर्षांचे होते
आणि २०१८ मध्ये ते लष्करात दाखल झाले होते.
ते राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील लाडनून तालुक्यातील सजवंतगड येथील रहिवासी होते.
तर गनर सौविक हाजरा हे २२ वर्षांचे होते
आणि २०१९ मध्ये ते लष्करात दाखल झाले होते.
ते पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील खमरबेरिया येथील रहिवासी होते.