*कोकण Express*
*सर्व निवडणूक निकालामध्ये जिल्हा शतप्रतिशत भाजपमय करा-.बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण*
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या आणि नंतर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. या सर्व निवडणूक निकालामध्ये जिल्हा शतप्रतिशत भाजपमय करा. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे, केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार असल्याने जिल्ह्यामध्येही भाजपची ताकद अधिक वाढवली पाहिजे. भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावीपणे प्रयत्न करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
भाजपच्या मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री चव्हाण यांनी घेतली. बैठकीला माजी खासदार प्रदेश उपाध्यक्ष नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, रत्नागिरी उत्तरचे कार्याध्यक्ष केदार साठे उपस्थित होते. २२८ ग्रामपंचायत निवडणुकांसदर्भातील आढावा व त्याचे नियोजन, संघटनात्मक बाबींसंदर्भात बैठकीत चर्चा झाली.