*कोकण Express*
*हळवल फाटा येथील उड्डानपूल संपतो तिथे धोकादायक वळणावर बोर्ड लावावेत..*
*शिवसेनेच्यावतीने कणकवली उपविभागिय अधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हळवल फाटयावरील अपघातांची मालिका कमी होण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.नॅशनल हायवे NH-66 या मार्गावर हळवल फाटयानजिक अपघातांची मालिका सुरु असून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. वळण धोकादायक असून बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी झालेले आहेत. त्यासाठी खालील उपाय योजना करावी अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली आहे.
१) हळवल फाट्याजवळ हायवेवर रमलर लावावेत,२) फाटयावर उजेड दिसावा यासाठी हायमास्ट बसवावा,३) उड्डानपूल संपतो त्यापासून या वळणापर्यंत धोकादायक वळण म्हणून बोर्ड लावावेत.संबंधित ठेकेदाराशी बोलून व आपण लक्ष घालून सदरची उपाय योजना आठ दिवसात पूर्ण करावी अन्यथा आम्हाला याबाबत आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल ,असा इशारा दिला आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग नाईक, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, उपतालुका प्रमुख राजु राणे, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, कळसुली विभागप्रमुख चंदु परब, युवासेना विभागप्रमुख रोहीत राणे, अरुण राणे, विलास गुडेकर, गणेश राणे, सौरभ सावंत, मधु चव्हान, सचिन राणे, रवी परब, सुभाष परब, विजय परब, जनार्दन डोबकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.