*कोकण Express*
*बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी केले अभिवादन!*
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन शिवसेनेचे संदेश पारकर यांनी अभिवादन केले आहे .आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि अवघी मुंबई स्तब्ध झाली. महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांचा जीवनप्रवासही अनेक वळणं घेणारा होता. म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदान आपल्या अनेक भाषणांनी गाजवले होते. यामुळे याच दादर शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. या स्मृतीस्थळाला 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तसेच आजच्या स्मृतिदिनी मोठ्या संख्येने शिवसैनिक होते