दोडामार्गात वक्रत्रूंड मित्रमंडळाच्या ऐतिहासिक दीपावली शो टाईमचे भव्य दिव्य उद्घाटन

दोडामार्गात वक्रत्रूंड मित्रमंडळाच्या ऐतिहासिक दीपावली शो टाईमचे भव्य दिव्य उद्घाटन

*कोकण Express*

*दोडामार्गात वक्रत्रूंड मित्रमंडळाच्या ऐतिहासिक दीपावली शो टाईमचे भव्य दिव्य उद्घाटन*

*उद्योजक विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती*

*दोडामार्ग/सुमित देसाई:-*

पहिल्यांदाच खुल्या रंगमंचावर होत असलेल्या दोडामार्गच्या वक्रत्रूंड मित्रमंडळाच्या ऐतिहासिक ‘दीपावली शो टाईम’चे शानदार उदघाटन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी श्रीफळ वाढवून केल. जिल्ह्यातील युवा उद्योजक तथा विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

दोडामार्ग शहरातील वक्रतुंड मित्रमंडळ बाजारपेठ दोडामार्ग यांनी यंदा १५ व्या वर्षात पदार्पण करताना मुख्य बाजारात खुल्या स्टेजवर या भव्य दिव्य शो टाईमचे आयोजन केलय. यासाठी मोठं योगदान देणाऱ्या उद्योजक विशाल परब यांच वक्रत्रूंड मंडळाने दोडामार्गात जल्लोषी स्वागत केले. विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘दोडामार्ग आयडॉल’ स्पर्धेचा शुभारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, उद्योजक विवेकानंद नाईक, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला व बालकल्याण सभापती ज्योती जाधव, माजी सभापती लक्ष्मण नाईक, गणपत देसाई, माजी जि. प. आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, नगरपंचायत बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव, नगरसेविका क्रांती जाधव, सुकन्या पनवेलकर, स्वराली गवस, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, पांडुरंग बोर्डेकर, संजय खडपकर, संजना म्हावळणकर, वासंती मयेकर, चंदन गांवकर, यांसह मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, प्रकाश सावंत, राजेश फुलारी, विशाल मणेरीकर, समीर रेडकर, विशाल चव्हाण, गोकुळदास बोन्द्रे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!