वेंगुर्लेच्या संगीत क्षेत्रात भर घालणारया ” तालविश्व संगीत विद्यालयाचे ” मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्लेच्या संगीत क्षेत्रात भर घालणारया ” तालविश्व संगीत विद्यालयाचे ” मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

*कोकण Express*

*वेंगुर्लेच्या संगीत क्षेत्रात भर घालणारया ” तालविश्व संगीत विद्यालयाचे ” मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन*

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावातील हरिचरणगीरी तिठा येथे श्री गणेशमूर्ती कलाआकार केंद्रामध्ये ” तालविश्व संगीत विद्यालयाचा ” शुभारंभ भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , वायंगणी सरपंच सुमन कामत , खानोली सो.सा.चेअरमन प्रशांत खानोलकर , सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे प्रकाश आकेरकर , भाजपा सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
हरिचरणगीरी येथील युवा कलाकार अनंत मठकर यांच्या संकल्पनेतून व पखवाज मध्ये एम.ए.ची पदवी घेतलेले मनिष तांबोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पखवाज वादन तसेच तबलावादन शिकवले जाणार आहे. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार परिक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे .
संगीत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम या संगीत विद्यालयातून होते , हे अभिमानास्पद आहे . सध्याच्या आधुनिक युगात युवा पिढी व्यसनाधीन होत असताना संगिता सारख्या कले कडे युवा वर्ग आकृष्ट होत आहे , हे सुद्धा भुषणावह आहे. तसेच ही कला जोपासण्यासाठी अशा संगीत विद्यालयाची आवश्यकता आहे , असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी प्रसंन्ना देसाई यांनी केले .
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अनंत मठकर यांनी केले . यावेळी सचिन नाईक , अमोल आकेरकर , शुभम करंगुटकर , दत्तात्रय मठकर इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!