सैन्य दलातील नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सावंतवाडी येथे सत्कार

सैन्य दलातील नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सावंतवाडी येथे सत्कार

*कोकण Express*

*सैन्य दलातील नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सावंतवाडी येथे सत्कार*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

भारतीय सैन्य दलातील नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, डिस्ट्रिक्ट सेंटर, सिंधुदुर्ग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग शाखा कोलगांव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन सुभेदार मेजर शिवराम जोशी व आय. ई. एस. एल. चे जिल्हा अध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे यांच्या हस्ते गावकर व त्यांचे वडील विजय गावकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, भारतीय भूतपूर्व माजी सैनिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी हवालदार दीपक राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष कॅप्टन विक्टर पिंटो, सैनिक स्कूल आंबोलीचे प्रशिक्षक सुभेदार शिवराज पवार, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, समन्वयक एस. एम. चंद्रशेखर जोशी, सुभेदार सुभाष कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे, कुडाळ शाखाव्यवस्थापक सुहास सावंत, कोलगांव शाखाव्यवस्थापक सौ. संगीता सावंत, आदींसह अनेक माजी सैनिक व सैनिक नागरी पतसंस्था कर्मचारी उपस्थित होते.

शिवराम जोशी, शशिकांत गावडे, विक्टर पिंटो यांनी लेफ्टनंट दिपाली गावकरचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लेफ्टनंट दिपाली गावकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपण कसे घडलो व सैन्यात भरती होण्यासाठी शर्थीचे कसे प्रयत्न कले हे विशद केले. या बाबतीत आई- वडील आणि भावाचे मोलाचे योगदान आहे असे सांगितले. सैनिकांनी केलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे आपण भारावून गेली आहे. हा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे. मी आयुष्यात कधीच हा सत्कार विसरु शकणार नाही. तसेच जिल्हावासीयांनी माझे केलेले अद्वितीय स्वागत आणि सत्कार समारंभ हे आपणास अनपेक्षितच होते असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हेमांगी चंद्रशेखर जोशी यांनी केले. कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार भारतीय भूतपूर्व माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा परब यांनी मानले. तसेच लेफ्टनंट दिपाली गावकर ह्या सोमवार दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली शाळेला भेट देऊन बालसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!