*कोकण Express*
*प्रख्यात लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांची बापार्डे ग्रामपंचायतीला भेट….!*
*देवगड ःःप्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीला सुप्रसिध्द लेखिका पद्मश्री सुधा मुर्ती यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेऊन राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या कामाबाबत विशेष कौतुक केले.
यावेळी त्यांच्यासोबत बापर्डे गावात शैक्षणिक तसेच बापर्डे ग्रामपंचायतला विशेष सहकार्य करणारे डॉ. सुहास राणे यांनीही भेट दिली. यावेळी बापर्डे ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. तसेच ग्रामपंचायतीने मिळविलेल्या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच संजय लाड, उपसरपंच रमेश देवळेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईकधुरे, जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे, ग्रामसेवक शिवराज राठोड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे, चेअरमन अजित राणे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास नाईकधुरे, प्रियांका राणे, अतुल राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, एम. बी. नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.