*कोकण Express*
*मालवणात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे झाले उद्घाटन*
*मालवण शाखा कार्यालय जनतेच्या हितासाठी काम करणारे जनसेवा केंद्र ; संजय आग्रे*
बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष स्व. बाळासाहेबांचे समाजसेवेचे विचार पुढे नेणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुक्यातील पहिले कार्यालय आज मालवण शहरात सुरू होत आहे. मालवण मधील हे शाखा कार्यालय जनतेच्या हितासाठी काम करणारे जनसेवा केंद्र व्हायला हवे असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य संजय आग्रे यांनी प्रास्ताविकात केले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण तालुक्यातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन मालवण शहरात माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते, सिंधुरत्न योजनेचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी माजी जि. प. सदस्य संदेश पटेल, भास्कर राणे, भूषण परुळेकर, सुनील पारकर, शेखर राणे, बबन शिंदे,महेश राणे, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, वर्षा कुडाळकर, अनुप्रीती खोचरे, बाळू नाटेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरुण तोडणकर, राजा तोंडवळकर, आशिष नाबर, डॉ. जितेंद्र केरकर, सागर तोडणकर, करण तोडणकर, पराग खोत, भारती घारकर आदी उपस्थित होते.