*कोकण Express*
*खासदार विनायक राऊत यांची माहिती……*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
केंद्रीय आयुष मंत्री मा.ना.श्री. श्रीपाद नाईक यांचे आदेशानुसार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री विनायकजी राऊत यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने NIMP हा महत्वाकांशी प्रकल्प मौजे आडाळी ता.दोडामार्ग येथे मंजूर केला आहे.मौजे आडाळी येथील एमआयडीसीच्या ५० एकर मोकळ्या जागेमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम घाटातील दोडामार्ग परिसरात विविध प्रकारची औषधी वनस्पती असल्याने केंद्रीय आयुष मंत्रालयाने NIMP प्रकल्पाला आडाळी येथील जागेत पसंती दर्शविली होती. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा आयुष कार्यालयामार्फत ५० एकर जागेवरील प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असल्याचे खासदार श्री विनायकजी राऊत यांनी सांगितले.आता महाराष्ट्र सरकारने आडाळी येथील जागेला अंतिम मान्यता दिल्याने परिपूर्ण प्रस्ताव लवकरच केंद्रसरकारच्या आयुष कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.