*कोकण Express*
*दिविजा वृध्दाश्रमातील नाविन्यपूर्ण आजोबांचा लग्नसोहळा*
*कासार्डे ;संजय भोसले*
स्वस्तिक फाउंडेशन संचालित असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात तुलशी विवाहाला नाविन्यपूर्ण आजोबांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचा आनंद सर्व आजी आजोबा आणि कर्मचार्यांनी घेतला.
या वृध्दाश्रमात सर्वच सण, उत्सव आनंदाने व उत्साहपूर्वक वातावरणात साजरे केले जातात. हे सण, उत्सव साजरे करण्यामागे हाच मुख्य हेतु आहे कि अशा दुलऀक्षित घटकांना दिविजा वृद्धाश्रमाच्या छताखाली प्रकाशाची नविन वाट, नवी उमेद, नात्यांचे नविन रेशीमबंध घट्ट करता करता मनोरंजन व निखळ आनंद मिळाला पाहिजे. त्यामुळे दरवर्षी दिविजा वृध्दाश्रमातील आजी-आजोबांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होते.
तुळशी विवाह हा सण आपल्या ग्रामीण भागात अगदि आनंदात व जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या वृध्दाश्रमात आगळ्यावेगळया पध्दतीने लग्नसोहळा पार पडला. यावेळी तुळशी सोबत अविवाहित असलेल्या आजोबांचे लग्नसोहळा अगदि विधीवत करण्यासाठी लग्नपत्रिका छापून व त्या वितरीत करून, तुळशी वृंदावनाला छान शालू, दागिने, बाशिंग, मुंडावळी बांधून नवरीचे रूप दिले व आजोबांना नवरदेव करून लग्नसोहळा करण्यात आला.
या सोहळ्याची सुरूवात तांदूळ निवडणे, हळद लावणे, निम्म सांडणे, घाणा पूजन करत पारंपरिक वेशभूषा करून बाशिंग , मुंडावळ्या बांधून सनई चौघडाच्यात तालात अंतरपाटासमोर उभे करून सर्व मानापानासहित करवली व मामाच्या नात्यासह मंडप, सनई चौघडा, मंगलाष्टके, अक्षतांचा भडिमार करत फटाक्याच्या धामधुमीत अगदि विधीस्वरूप लग्न लावले. अश्या या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद अनुभवण्यासाठी कणकवली येथून नाडकर्णी कुटुंबीय व ठाणा मुलुंड येथील पराडकर कुटुंबीय उपस्थित होते.
आश्रमातील संचालक श्रीमती दिपिका रांबाडे व संदेश शेट्ये, सर्व कर्मचारी वर्ग यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. हा लग्नसोहळा या जन्मी “याची देहि, याची डोळा” पाहण्यास मिळाला असे उदगार आजी-आजोबांनी काढले.