*कोकण Express*
*गुरुकुलच्या पोलीस भरती मोफत मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*कासार्डे; संजय भोसले*
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले मोठ्या संख्येने भरती व्हावीत याकरिता गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोसच्या वतीने एक दिवशीय मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातील अनेक गावातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरामध्ये पोलीस भरती सराव पेपर, पेपर विश्लेषण, विषय लेक्चर्स , सन 2022 मधील भरतीमध्ये यशस्वी होण्याकरिता अभ्यास पद्धती, कागदपत्र, भरती प्रक्रिया आणि 14 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू होणाऱ्या गुरुकुलच्या फास्टट्रॅक पोलीस भरती बॅच विषयीचे सविस्तर मार्गदर्शन गुरुकुलचे प्राध्यापक एस.जी.ढोणुकसे व प्रा.बी.एस.जांभेकर यांनी केले.
शिबिर यशस्वी होण्याकरिता अकॅडमीचे कोच संकेत कदम, रामू जंगले,अमोल सुद्रिक,महिला कोच सुमिता चव्हाण,सिद्धांत डांगी व अकॅडमी प्रशिक्षणार्थ्यांनी मेहनत घेतली होती. जिल्ह्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला पोलीस भरती कागदपत्र अथवा फॉर्म भरण्याविषयी अडचण आल्यास त्यांनी 9075385256/9923833793 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन गुरुकुलच्या वतीने करण्यात आले आहे.