*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. अपर्णा प्रशांत कोठावळे यांची मानवाधिकार न्याय ट्रस्ट, नवी दिल्लीच्या सिंधुदुर्ग मीडिया प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष अँड किशन गोयल यांनी कोल्हापूर येथील आयोजित कार्यक्रमाच्या भेटी दरम्यान जाहीर केली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.