*कोकण Express*
*सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपली नावे व मोबाईल नंबर विकास सोसायटी अथवा ग्रामपंचायत मध्ये नोंदवावी…*
*फोंडाघाट विकास सोसायटी चेअरमन राजन नानचे यांचे नागरिकांना आव्हान*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
फोंडाघाट मधील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे सतत पडणाऱ्या पावसामुळे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांनी आपली नावे व मोबाईल नंबर फोंडाघाट विकास सोसायटी अथवा फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये नोंदवावी आणि आपल्या नुकसान झालेल्या शेतीचा भातपीक नोंद असलेला सातबारा उतारा 7/12 ठेवावा जेणेकरून भातपीक नुकसान पंचनामा करताना आपले नुकसान झालेले क्षेत्र पंचनाम्यात घालता येईल. शेतकरी बांधवांनो शेतातील उभ्या पीकाच्या केसरांना (लोंबाना) कोंब आलेले आहेत तरी आपल्या शेतात जाऊन आपल्या पीकाची पहाणी करून नुकसान असल्यास वरील ठिकाणी नावे नोंदवावी . जेणेकरून कृषी अधिकारी अथवा कृषी सेवक आपल्या शेतात येऊन पहाणी करतील.