शिवसेनेच्या मेळाव्यासाठी भास्कर जाधव यांना पुन्हा कणकवलीत आणून आम्ही परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू

शिवसेनेच्या मेळाव्यासाठी भास्कर जाधव यांना पुन्हा कणकवलीत आणून आम्ही परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू

*कोकण Express*

*शिवसेनेच्या मेळाव्यासाठी भास्कर जाधव यांना पुन्हा कणकवलीत आणून आम्ही परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू…*

*भास्कर जाधव यांना कणकवलीत आणणार,हिंमत असेल तर अडवून दाखवा सतीश सावंत यांचा इशारा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आम.भास्कर जाधव यांच्या बद्दल असंसदीय शब्दात टीका केली. त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा.शिवसेना नेते आ. भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे भास्कर जाधव यांच्या उपस्थित कणकवलीचा शिवसेनेचा मेळावा होईल, लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना पुन्हा आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. तुमच्यात हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला. प्रशोभक आणि असंसदीय विधाने करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना जनताच जिल्ह्यात फिरू देणार नाही असेही सतीश सावंत म्हणाले.

कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देत आ. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आम.भास्कर जाधव यांचा पुतळा जाळत कोण धमकी देत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमदार नितेश राणेंवर गुन्हा केव्हा दाखल करणार? ज्या पद्धतीने आ. भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा तातडीने दाखल केला. त्या पद्धतीने तातडीने गुन्हे दाखल करावेत, सरकार म्हणून कायदा हातात घेऊ शकत नाही. कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली.

तर याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये यांनी आम. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख निलम पालव सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, नगरसेवक कन्हैया पारकर, उत्तम लोके, विलास गुडेकर, दिव्या साळगावकर, सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर, वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री, बंडू ठाकुर, महेंद्र डिचोलकर, वैभव मालंडकर, निसार शेख, रिमेश चव्हाण, सिद्धेश राणे, तात्या निकम आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सतीश सावंत पुढे म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत हिन शब्दात टीका केली आहे. त्यांनी वापरलेले शब्द घटनेत बसणारे आहेत का? याचा विचार करावा. भटके कुत्रे, सोंगाडे यासारखे शब्द वापरून जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यामुळे वातावरण बिघडू पाहणाऱ्या नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे सांगताना आम. भास्कर जाधव यांनी केवळ नकला केल्या होत्या. त्यांच्यावर ज्या गतीने गुन्हा दाखल करण्यात आला त्याच गतीने आता नितेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा असे सतीश सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!