*कोकण Express*
*वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला खिंडार…*
*आ.नितेश राणेंचा देवगड नंतर ठाकरे गटाला दुसरा धक्का*
*कुर्ली गावातील प्रमुख शिवसैनिक,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक भाजपात दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यातही उद्धव ठाकरे सेनेला जोरदार दणका दिला आहे.वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, दूध डेअरीचे चेअरमन तसेच शिवसेनेचे कुर्ली गावातील प्रमुख पदाधिकारी अशा असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि बँक संचालक दिलीप रावराणे माजी सभापती अंबाजी हुंबे उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, सोसायटी संचालक विलास पोवार, पांडुरंग परब, दूध डेअरी चेअरमन दशरथ पाटील, दीपाली पाटील, पराग पाटील, ग्रा पं सदस्य विजया पवार, उर्मिला सावंत, सत्यवान पाटील, बापू सावंत, मधुकर सावंत, कृष्णा सावंत, संदीप पवार, बबन हुंबे, रामचंद्र बोडेकर, धाकू शेळके, अनंत सूद, अरुण सूद, सुजित पडवळ, आदी प्रमुख शिवसैनिकांनी आज ठाकरेंना अलविदा करत आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे कमळ हाती घेतले.जिल्हा बँक संचालक तथा माजी जि प सभापती दिलीप रावराणे , कुर्ली माजी सरपंच अंबाजी हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ली गावातील असंख्य शिवसैनिकांनी राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला.