*कोकण Express*
*कणकवली संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांचा पुतळा जाळून केली घोषणाबाजी*
शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद आज कणकवलीत उमटले. कणकवली भजपाच्या संतप्त कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला लाथा बुक्क्यांनी मारून दहन केले. भास्कर जाधव भडवा है..! चोर है..! हाय हाय हाय भास्कर जाधव हाय हाय..!! सोंगाड्या सोंगाड्या भास्कर जाधव सोंगाड्या..!अशा संतप्त घोषणा देत कणकवलीच्या मुख्य चौकात हा पुतळा जाळण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महिला तालुका अध्यक्ष प्राची कर्पे, स्वप्नील चिंदरकर ,निखिल आचरेकर, जाणवले येथील संदीप सावंत, कळसुली सरपंच सचिन पारधिये, नितीन पाडावे, युवक शहराध्यक्ष गणेश जळगावकर, युवक जिल्हा सरचिटणीस संदीप मिस्त्री, वरवडे उपसरपंच आनंद घाडी, पप्पू पुजारे समीर प्रभू गावकर नयन दळवी सर्वेश दळवी आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.