*कोकण Express*
*वैभववाडीत जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी काढला निषेध मोर्चा*
*वाळू चोर भास्कर जाधव यांनी तोंडाला आळा घालावा : अन्यथा वाईट परिणाम – नसीर काझी यांचा इशारा*
वाळू चोर भास्कर जाधव यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा वैभववाडी भाजपच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. शिवसेना नेते जाधव यांनी तोंडाला वेळीच आवर घालावा, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील. असा इशारा वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत वैभववाडी भाजपाने रॅली काढत घोषणाबाजी केली. भास्कर जाधव चोर है… भास्कर जाधव भडवा है…अशा घोषणाबाजी देत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भास्कर जाधव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पोलीस निरीक्षक अमित यादव यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी नासीर काझी म्हणाले, जिल्ह्यात चांगले वातावरण असताना ते बिघडवण्याचे काम जाधव करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीत जाधव यांनी टीका केली आहे. अशी टीका जिल्ह्यात कदापि सहन करणार नाही. भास्कर जाधव यांच्या विरोधात लवकरच जनआंदोलन करणार असा इशाराही काझी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास भाजपा जबाबदार रहाणार नाही असे काझी यांनी ठणकावून सांगितले आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.