*कोकण Express*
*आ. नितेश राणे कोकण मत्स्य महाविद्यालय साकारकर्ते*
*मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिनगारे यांनी सदिच्छा भेट घेत मानले आभार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकणातील पहिले मत्स्य महाविद्यालय सिंधुदुर्गात निर्माण करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न आमदार नितेश राणेंमुळे साकार होत आहे. सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोकण पट्ट्यात मत्स्य महाविद्यालयामुळे नवी शैक्षणिक क्रांती होणार आहे आणि याचे श्रेय भाजपा आमदार नितेश राणेंना आहे, अशा भावना रत्नागिरी मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्गात सुरू होत असलेल्या मत्स्य महाविद्यालयात संदर्भात आमदार नितेश राणे यांची भेट घेत अधिष्ठाता डॉ. शिनगारे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.डॉ. नितीन सावंत, डॉ.सुरेश नाईक, डॉ.जयप्पा कोळी, डॉ. मनोज घुघुसकर, श्री.कल्पेश शिंदे आदी उपस्थित होते.