*कोकण Express*
*नितेश राणेंचा देवगडात ठाकरे सिनेला जोरदार धक्का*
*सरपंच व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*
*देवगड ःःप्रतिनिधी*
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला चांगलाच दणका दिला देवगड तालुक्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे
यावेळी माजी आमदार अजित गोगटे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर जिल्हा बँकेचे संचालक एडवोकेट प्रकाश बोडस भाजपा प्रदा पदाधिकारी संदीप साटम प्रकाश राणे योगेश पाटकर दयानंद पाटील भाजपाचे नगरपंचायतीतील गटनेते शरद ठुकरुल उपस्थित होते
प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पावणाई गावचे सरपंच गोविंद उर्फ पप्पू लाड, वानिवडे सरपंच प्राची प्रल्हाद घाडी, मधुरा मारुती घाडी ग्रामपंचायत सदस्य पावणाई, पावणाई गावचे उपसरपंच धनंजय दिनकर घाडी, पावणाई ग्रामपंचायतीच्या सदस्या कस्तुरी कल्पेश साटम, तळवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच गणेश तुकाराम लाड, यांनी प्रवेश केला आहे
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही यावेळी प्रवेश केला असून प्रल्हाद प्रकाश घाडी वानिवडे शाखाप्रमुख, विजय राम बाईत उपविभाग प्रमुख वानिवडे, रामचंद्र चंद्रकांत मासये शाळा व्यवस्थापन समिती पावणाई, शैलेश मधुकर घाडी वानिवडे उपशाखाप्रमुख, निलेश मनोहर राघव मनसे शाखा अध्यक्ष, अनिल यशवंत दळवी पावडाई शाखाप्रमुख, तसेच शिवसैनिक देवेंद्र लाड, प्रदीप लाड, अमित लाड, गौरव पाताडे, समीर लाड, बापू घाडी, वैभव घाडगे, दीपक प्रभू, चंद्रकांत घाडी, निलेश घाडी, यांनी प्रवेश केला आहे