*कोकण Express*
*जाधव यांनी पुन्हा सिंधुदुर्गात पाय ठेवल्यास खारेपाटणच्या बॉर्डरवर करेक्ट कार्यक्रम करू*
*भास्कर जाधव याचं मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोला संतोष कानडे यांनी लगावला*
*चोराच्या उलट्या बोंबा मारणारा भास्कर जाधव याची टीका राणेंचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे कुटुंबावर आमदार भास्कर जाधव यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरोपांचा निषेध करत आहोत. भास्कर जाधव औकात मध्ये राहावे,भास्कर जाधव तुम्ही पुन्हा सिंधुदुर्गात आल्यास करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे.
भास्कर जाधव यांना एकच सवाल आहे, तुम्ही जे चिपळूण मध्ये केलेले प्रकार ते उघडकीस आणण्यास आम्हाला वेळ लागणार नाही.तसेच आ. भास्कर जाधव यांनी चिपळूण मध्ये वाळू चोरी करून मोठे झालेले नेते म्हणून सध्या शिवसेनेचे मिरवत आहेत.त्यांनी आपल्या कार्यालयात इम्तियाज मुकादम या व्यक्तीला बोलून ऑफिसमध्ये मारहाण केली. पेडणेकर पत्रकार यांना पहिल्या माळ्यावरून त्यांनी खाली ढकलले ,हा शिवसेनेचा नेता म्हणून जो मिरवतोय. त्यानंतर आपण तुम्हाला सर्वांचे हिंदू धर्माचे आराध्य दैवत शारदा देवी मातेच्या मंदिरामध्ये त्यांनी जी लोकांना शिवीगाळ केली होती .आपल्याच लोकांना शिवीगाळ केली त्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. भास्कर जाधव आमच्या राणेंवर बोलत असतील, तुम्हाला दुसरी अजून एक गोष्ट सांगतो निष्ठावंत शिवैनिक सचिन कदम याला ज्यावेळी तालुकाप्रमुख चिपळूण घोषित केले, त्यावेळी या माणसाने धिंगाणा घातला होता. म्हणजे हा माणूस कोणाला मोठं करण्यासाठी स्वतः काय करू शकत नाही, दुसऱ्याला पण मोठा पाहू शकत नाही.त्यांना ते आवडत नाही. भास्कर जाधव याचं मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोला संतोष कानडे यांनी लगावला.
कोकणामध्ये भरपूर काय केलेलं राणेंनी केलं आहे. तुम्ही ९ खात्याचे मंत्री होता, त्या खात्याच्या मंत्रीपदाचा किती फायदा आपण चिपळूणला केला? दुसरी गोष्ट मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे,असे सांगता ज्यावेळी २०१४ साली पहिली यादी जाहीर झाली.तेव्हा पहिल्या यादीमध्ये या भास्कर जाधव यांचे नाव नव्हत त्यावेळी त्यांनी गाडीत बसून उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या आहेत, त्या शिव्यांची क्लिप पण आपल्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपये मागितले, मला तिकीट देण्यासाठी असा आरोप तुम्ही केला होता, त्यांनी त्या ठाकरे घराण्याची बगल केली होती आणि आता तोच माणूस या ठिकाणी आपलं मोठेपण मिळवतोय कशासाठी? तर त्याला पक्षप्रमुख व्हायचं आहे .
दुसऱ्याची निंदा करून आपलं मोठेपण कधीच होत नाही याची नोंद भास्कर जाधव यांनी घ्यायची आहे. डोक्यात त्याचा डोकं काम करत नाही. त्याचा मेंदू गुडघ्यात आहे. आणि त्यांनी राजीनामा नाट्य सुरू केलं २०१७ साली जी गोष्ट मी आपल्याला सांगतो .राजीनामा दिला आणि लोकांना भावनिक आव्हान केलं की मला डावलले. ठाकरेंच्या मोठेपणासाठी हे उलट सुलट या ठिकाणी टीका चालू आहे. आम्ही ज्या पक्षाचा काम करत आहोत तो भारतीय जनता पार्टी एक सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. पुन्हा आम्हाला मुळ भूमिकेत जायला लावू नका ,असा इशारा संतोष कानडे यांनी दिला.
सिंधुदुर्गाच्या जिल्ह्याच्या राणेंच्या विरोधात बोलायला येत असाल तर बॉर्डर वरती त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही केलेली आहे. त्यामुळे तुम्ही गोष्ट आम्हाला समजली असती तर तुमचा करेक्ट कार्यक्रम खारेपाटण येथे होणार आहे. ज्या माणसाने एवढी मेहनत करून खडकर उच्च पदावर पोहचले आहेत. तुम्ही अजून त्या ठिकाणी आहात दोघांची तुलना करताना तुमची तुलना कधी होऊ शकत नाही.तरीपण भास्कर जाधव या व्यक्तीने सिंधुदुर्ग भाषा वापरलेली आहे त्या शिवराय भाषेचे उत्तर सिंधुदुर्ग आल्यानंतर आपल्याला दिले जाईल,असा इशारा संतोष कानडे यांनी दिला आहे.