कणकवली तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे १९ रोजी आयोजन

कणकवली तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे १९ रोजी आयोजन

*कोकण Express*

*कणकवली तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे १९ रोजी आयोजन….*

*क्रीडा शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन..*

*कासार्डे:- संजय भोसले*

कोरोनाच्या प्रतिबंधना नंतर प्रथमच सन-२०२२/२३ या
शैक्षणिक वर्षात शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा आयोजन पुढील महिन्यात सुरु करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर दहा खेळांच्या ( कुस्ती,योगा,कॅरम, तायक्वांडो,कबड्डी,खो खो, क्रिकेट, फुटबॉल,
व्हाॅलीबॉल,व ॶॅथलेटिक्स/ मैदानी) क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाची सभा क्रीडा परिषेदेचे अध्यक्ष श्री. आर.जे.पवार तहसिलदार कणकवली यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १९/१०/२०२२ रोजी दुपारी २.३० वाजता तहसिलदार कार्यालय कणकवली येथे संपन्न होणार आहे.
तरी कणकवली तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील क्रीडा शिक्षकांनी तसेच क्रीडा प्रेमी व तालुक्यातील एकविध खेळ संघटना असोसिएशनचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि कणकवली तालुका समन्वयक बयाजी बुराण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!