*कोकण Express*
*मालवण ः प्रतिनिधी*
आगामी गोळवन कुमामे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक वासुदेव पावसकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गोळवण ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा धक्का समजला जात आहे.. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील राणेंचे शिलेदार फोडण्यास सुरुवात केली आहे. मालवण तालुक्यातील गोळवण गावातील राणे समर्थक वासुदेव पावसकर यांनी रविवारी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज वर्दम, बाळा महाभोज, विजय पालव, नाना नेरकर, भाऊ चव्हाण, प्रज्ञा चव्हाण, डॉ. सावंत, बाबू टेंबुलकर यांच्यासह गोळवण ग्रामस्थ उपस्थित होते. पावसकर हे सिंधुदुर्ग शेतकरी लाकूड व्यावसायिक संघाचे अध्यक्ष असून त्यांच्या पत्नी सपना पावसकर यांनी जिल्हा परिषद सदस्यपद आणि महिला बालकल्याण सभापती पद भूषविले आहे. येत्या १५ जानेवारीला गोळवण-कुमामे ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर भाजपला हा धक्का समजला जात आहे.