दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष- आद राजरत्न अशोकराव आंबेडकर. शाखा सिंधुदुर्ग या संघटनेत मालवणच्या बौद्ध बांधवांचा प्रवेश

दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष- आद राजरत्न अशोकराव आंबेडकर. शाखा सिंधुदुर्ग या संघटनेत मालवणच्या बौद्ध बांधवांचा प्रवेश

*कोकण Express*

*दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष- आद राजरत्न अशोकराव आंबेडकर. शाखा सिंधुदुर्ग या संघटनेत मालवणच्या बौद्ध बांधवांचा प्रवेश*

*कासार्डे; संजय भोसले*

जागतिक बौध्द संघटनेचे ( World Fellowship of Buddhist) सन्माननीय सचिव व बोधीसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदर संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक १६/१०/२०२२ रोजी मालवण बौध्दवाडी, एस्. टी. स्टँड नजीक असलेल्या समाजमंदिर येथे सकाळी ११.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आयु. विद्याधर धोंडु कदम कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष आयु. पी. के‌ चौकेकर यांच्या समाजभावनेतुन व आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाची गरज ओळखून सभा आयोजित करण्यात आली. या सभेला कोकण विभागीय कमिटीचेसचिव आयु. हेमंतकुमार धर्माजी तांबे ओसरगावकर, तसेच जिल्हा पदाधिकारी जिल्हा महासचिव प्रा. आयु. अशोक धोंडु कांबळे सर कलमठ कणकवली, उपाध्यक्ष आयु. सुधीर धामणकर हरकुळ बुद्रुक, मुख्य संघटक प्रा. आयु. आनंद कदम सर नारिंग्रेकर, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार कासले माळगावकर, जिल्हा संघटक आयु. संजय रामा पाटील हरकुळ बुद्रुक, माजी श्रामणेर, सामाजिक कार्यकर्ते आयु.आनंद विश्राम धामापुरकर, आयु. रविंद्र जाधव सर कुसबेकर, आयु. एम. पी. जाधव घावनळेकर, आयु. सिध्दार्थ मनोहर जाधव मालवण, मालवण तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार माननीय आनंद मालवणकर, फुले शाहु आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आयु. नरेंद्र पेंडुरकर, आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे या प्रशालेचे मुख्याध्यापक आयु. किशोर चव्हाण सर, आयु. पुरुषोत्तम मालवणकर, आयु. भगवान कदम, आयु. दिपक भिकाजी अणावकर, आयु. प्रभाकर देऊलकर, आयु. दुलाजी चौकेकर, आयु. संदेश डिकवलकर, आयुष्यमानीनी शुभ्रा संदेश डिकवलकर, आयु. भिवा तळगावकर, आयु. संतोष मालवणकर, आयु. विष्णु बाबुराव चौकेकर, आयु. महेश कोळंबकर, आयु. सतिश वाघमारे वगैरे धम्मबांधव उपस्थित होते. सुरुवातीला बुध्दवंदनेने सुरूवात केली. त्यानंतर आयु. संदेश डिकवलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आयु विद्याधर कदम यांनी सभेत उपस्थित बांधवांना सभेची माहीती दिली, सर्वांची ओळख करून दिली व आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत संघटनेची माहिती देताना सांगितले की, आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी बुध्दीस्ट कम्युनिटी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांना साथ देणे ही काळाची गरज आहे. जागतिक बौध्द संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. जागतिक बौध्द धम्म परिषदेचे डेलीगेट हे आदरणीय राजरत्न आंबेडकर आहेत. नागपूर येथे जागतिक दर्जाचे विद्यापीठ प्रस्तावित आहे, ठाणे जिल्ह्यात बँक उभारण्यात आलेने त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील स्थापना करावयाची आहे. मुळात राजरत्न आंबेडकर यांनी धार्मिक विधी पार पाडणे हे आपले उद्दिष्ट नसुन भारतीय बौद्धांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे त्याचसाठी आपणांस बुध्दीस्ट कम्युनिटी व्यवस्था उभी करावयाची आहे असे सांगितले. यावेळी महासचिव आयु. प्रा .अशोक कांबळे सर यांनी न्यायालयीन प्रक्रिया कशी घडली याची इत्यंभूत माहिती देऊन बौध्दांच्या विकासाबाबत संस्थेची धोरणे याची माहिती दिली . आयु. आनंद कदम सर यांनी जागतिक बौद्ध संघटनेशी संलग्नतेबाबत माहीती दिली, आयु. हेमंतकुमार तांबे यांनी धार्मिक विधी बाबतची माहिती दिली. तसेच विधी हा आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या उद्दीष्टांनुसार एकही पैसा न घेता करायचा आहे याची माहिती दिली. यावेळी माननीय आनंद धामापुरकर यांनी सांगीतले की आद राजरत्न आंबेडकर यांचे विचार , संस्थेमार्फत राबवित असलेले विविध उपक्रम यांच्यामूळेच बौद्धांचे कल्याण होणार असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया.. त्यानंतर मालवण तालुका प्रभारी तालुकाध्यक्ष आयु. पुरुषोत्तम मालवणकर यांची मालवण तालुका अध्यक्ष प्रभारी व मालवण शहर अध्यक्ष पदावर निवड करुन गावमौजे चौके व मालवण शहर कार्यकारिणी निवडण्यात आली. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित झालेले आयु. पी. के. चौकेकर यांनी मालवण तालुका कार्यकारिणी करण्यास व सभासद नोंदणी करण्यास मेहनत घेतली . त्यांनी इतर बौद्ध संघटनेचा राजीनामा देऊन फार मोठा हातभार लावला याबद्दल जिल्हाध्यक्ष आयु विद्याधर कदम यांनी आभार मानले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन आयु. संदेश डिकवलकर यांनी मानले व शेवटी सरणेत्तय घेऊन सभा संपविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!