जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे यांनी इंदोर येथे स्वीकारला एफसीबीए २०२२पुरस्कार

जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे यांनी इंदोर येथे स्वीकारला एफसीबीए २०२२पुरस्कार

*कोकण Express*

*जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे यांनी इंदोर येथे स्वीकारला एफसीबीए २०२२पुरस्कार*

*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए २०२२ पुरस्काराचे आरबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक यांच्या हस्ते इंदोर येथे वितरण*

*सिंधुदुर्ग नगरी (प्रतिनिधी)*

देशातील सहकारी बँकिंग संस्थांचे आर्थिक मूल्यमापन करून त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक Banking Frontiers यांच्यामार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील येथील मेरीयट हॉटेल मध्ये रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी आरबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक रत्नाकर देवळे,निवड समिती चे विक्रांत पोंकसे,एफसीबीचे संचालक मनोज अगरवाल,बाबू नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे यांनी स्वीकारला.या सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू , आरबीआयचे संचालक सतिश मराठे आदि मान्यवर उपस्थित होते.* सिंधुदुर्ग जिल्हा बँक चालू वर्षी सर्वोत्तम पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए 2022 पुरस्काराची मानकरी ठरली आहे. देशभरातील नागरी सहकारी बँका जिल्हा बँका अर्बन बँका वगैरे ३०० सहकारी बँकांनी विविध कॅटेगिरी मधील पुरस्कारांसाठी नॉमिनेशन दाखल केली होती प्राप्त झालेल्या नॉमिनेशन मधून पुरस्काराच्या निवडीसाठी समिती गठीत करण्यात आली होती.निवड समितीने नॉमिनेशन दाखल केलेल्या बँकांच्या कामाचा लेखाजोखा घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांनी विविध कॅटेगिरी मध्ये केलेल्या प्रगतीच्या आधारे तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले अत्याधुनिक सेवा वगैरे बाबी विचारात घेऊन विविध कॅटेगिरी मधील पुरस्कार साठी संबंधित बँकांची निवड करण्यात येते. बँकांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांनी केलेल्या प्रगतीच्या आधारे तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक सेवा इत्यादी बाबी विचारात घेऊन विविध कॅटेगिरी मधील पुरस्कारां साठी संबंधित बँकांची निवड करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कोअर बँकिंग सुविधा व स्वतःचे डाटा सेंटर उभारून ग्राहकांना, व्यापारी बँकांच्या बरोबरीने जिल्ह्यात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या दुर्गम भागातही असलेल्या शाखा सीबीएस संगणकिकृत केल्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील ९८ शाखांबरोबरच ३८ एटीम मशीन्स,मोबाईल अँपद्वारे एन इएफटी/आय एम पीएस सेवा, पॉस मशिन, युपीआय, शाखा स्तरावर बीबीपीएस, इत्यादी आधुनिक डिलिव्हरी चॅनेल्स ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मोबाईल ॲप ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. यू पीआय वापरणा-या ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या सर्वांचे मूल्यमापन एफसीबीए २०२२च्या निवड समितीमध्ये होऊन बँकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची दखल घेतली आहे बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व बँकेचे संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त करत बँक कर्मचारी अधिकारी झेप विभाग यांचे कोतुक केले आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!