*कोकण Express*
*एसीबी कार्यालयावरील मोर्चात कणकवलीतील तमाम शिवसैनिक होणार सहभागी*
आमदार वैभव नाईक हे शिंदे सरकारच्या दबावाला बळी न पडल्यामुळे एसीबीची नोटीस देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आमदार वैभव नाईक हे एकनिष्ठ राहिले. जे शिवसैनिक चिरे वाळू, खडी क्रशर चा व्यवसाय करताहेत त्यांना नोटिस देऊन मानसिक त्रास देण्यात येत आहे. याविरोधात उद्या 18 ऑक्टोबर रोजी जिल्हा शिवसेना निषेध मोर्चा काढणार असून कणकवली तालुक्यातून या मोर्चाला 700 हुन अधिक शिवसैनिक सहभागी होणार आहेत. उद्याच्या निषेध मोर्चात शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेते गौरीशंकर खोत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा बँक चे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवा सेनाजिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये उपस्थित होते. 30 जून च्या राजकीय सत्तांतरानंतर वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गात शिवसेना टिकवून ठेवण्याचे काम केले. शिवसैनिकांना बळ दिले. याचा राग धरून राज्य सरकार वैभव नाईक यांना त्रास देत असल्याचा पुनरुच्चार सावंत यांनी केला.