तळेरेचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ‘

तळेरेचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ‘

*कोकण Express*

*तळेरेचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ‘*

*कासार्डे;संजय भोसले*

तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास सखाराम पाताडे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत “हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड” यांनी -२०२२ चा राज्यस्तरीय आठवा” समाजरत्न कोकणगौरव पुरस्कार ” देवून सन्मानित केले आहे .
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .09.10.2022 रोजी लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह , चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे जिल्ह्यातील उपक्रमशील अधिकारी म्हणून परिचित आहेत.तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे अनोख्या शैलीने करीत आसलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी,शिक्षक आणि पालकप्रिय आहेत. ते कासार्डे गावचे सुपुत्र असून त्यांना यापुर्वीही अनेक तालुका जिल्हा राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!