*कोकण Express*
*खो-खो असोसिएशन आयोजित 37व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ*
*रत्नागिरीत सुरु होतोय खो खो चा महासंग्राम*
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित 37व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा. राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 48 संघ व सुमारे नऊशेहून अधिक खेळाडू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. दि. 15 ते 19 ऑक्टोबर अशी स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाला ना. उदय सामंत यांच्यासह आमदार शेखर निकम, आ. राजन साळवी, आ. योगेश कदम, उद्योजक किरण सामंत, भारतीय खो-खो संघटनेचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, मुख्याधिकारी तुषार बापट, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सरचिटणीस गोविंद शर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोवीडमधील दोन वर्षामध्ये बंद झालेल्या या स्पर्धा पुन्हा जोमाने सुरु झाल्या आहेत. राज्य संघटनेमार्फत किशोरकिशोरी गटाची पहिलीच स्पर्धा संपन्न होत आहे. यासाठी राज्यभरामधून एकूण 48 संघ दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर तीन मैदाने तयार करण्यात आली आहेत.