युवानेते विशाल परब हे अल्पावधीतच सिंधुदुर्गातील युवकांचे प्रेरणास्थान बनले

युवानेते विशाल परब हे अल्पावधीतच सिंधुदुर्गातील युवकांचे प्रेरणास्थान बनले

*कोकण Express*

*युवानेते विशाल परब हे अल्पावधीतच सिंधुदुर्गातील युवकांचे प्रेरणास्थान बनले*

*दिलदार बाणा, कर्तृत्ववान शैली असणारे युवानेते विशाल परब यांचा उद्या कुडाळत होत आहे वाढदिवस साजरा*

*सिंधुदुर्ग*

सध्या सिंधुदुर्गात हवा आहे ती भाजपचे युवा नेते विशाल परब यांची! कुडाळ तालुक्यातील वाडोस गावचे सुपुत्र असलेले विशाल परब अल्पावधीतच सिंधुदुर्गात युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. दिलदार बाणा, कर्तृत्ववान शैली यामुळे विशाल परब हे ग्रामीण भागात चर्चेत आहेत. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले विशाल परब हे तळागाळात काम करणारा उमदा तरुण ते आजचा युवानेता या जडणघडणीत खूप कष्ट दिसतात. उद्या, म्हणजे १५ ऑक्टोबर २०२२ रोजी विशाल परब यांचा वाढदिवस कुडाळमध्ये ‘न भूतो न भविष्यती’ असा साजरा होणार आहे. यावेळी राजकीय क्षेत्रातील दिग्गज कुडाळमध्ये असतील.

सामाजिक बांधिलकी जपणारे विशाल परब आज युवा वर्गासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरलेत. युवा उद्योजक असलेले विशाल परब यांनी सिंधुदुर्गात वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. शालेय मुलांना मदत, युवा वर्गासाठी “बॉडीबिल्डिंग स्पर्धा” घेऊन आपण केवळ उद्योजक नसून समाजाप्रती भान असणारा सामान्य नागरिक आहोत, हे दाखवून दिले आहे. आपल्या समाजकारणात केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता समाजासाठी आपण कसे उपयोगी येऊ शकतो, यावर विशाल यांनी अधिक भर दिला आहे.

वेंगुर्ले असो सावंतवाडी किंवा कुडाळ विशाल परब यांनी सामाजिक उपक्रम राबविलेत.समाजातील उपेक्षितांसाठी सुद्धा विशाल हे नेहमीच तत्पर असतात. केवळ पैसा कमवून श्रीमंत होता येत नाही, हे त्यांनी जाणले आहे.त्यामुळे आपण समाजासाठी एकरूप होऊन लढू शकतो, हे त्यांना माहीत आहे. आज सिंधुदुर्गात युवा नेतृत्व तयार होतंय ते सुद्धा सहयाद्रीच्या कुशीतील एका गावातून! भविष्यातील आमदारकीचे खणखणीत नाणे म्हणजे विशाल परब ! त्यांनी कोकणचे आमदार-खासदारीचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरविणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत. अशा ‘अलौकिक’ कर्तृत्ववान विशाल व्यक्तीमत्वाचा उद्या शनिवारी वाढदिवस!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!