*कोकण Express*
*संदेश पारकर; विमानतळाच्या गेटवर छत्रपतींचा पुतळा उभारण्याची मागणी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
चिपी विमानतळ सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी आयआरबी कंपनीच्या अधिकार्यांची भेट घेवून त्यांनी ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, तसेच विमानतळाच्या गेटवर शिव छत्रपतींचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली.
श्री.पारकर यांनी आयआरबी कंपनीच्या अधिकार्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल म्हापणकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, तालुकाप्रमुख बाळू परब, भोगवे सरपंच महेश सामंत, निलेश चमणकर, योगेश तेली, वसंत साटम आदी उपस्थित होते.