कोकण Express*
*जिल्हा उद्योग केंद्र आणि अग्रणी बँक अधिकाऱ्यांनी घेतली आ. वैभव नाईक यांची भेट*
*उद्योग व्यवसायाच्या प्रस्तावांचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा*
सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मुकेश मेश्राम व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी उद्योजकांच्या समस्या व प्रश्नांबाबत चर्चा झाली. उद्योग व्यवसायाच्या प्रस्तावांचा आढावा देखील आ. वैभव नाईक यांनी यावेळी घेतला. तसेच विविध सूचना केल्या.
उद्योग केंद्राकडून बँकांकडे पाठविलेले प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. तरच नवउद्योजक जिल्ह्यात तयार होतील. त्यादृष्टीने उद्योग केंद्र व अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम केले पाहिजे. तसेच दर महिन्याला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर उपलब्ध झालेले प्रस्ताव मंजूर करावेत. नवउद्योजकांना मार्गदर्शन करावे. अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी केल्या. त्यावर मुकेश मेश्राम, श्रीपाद दामले यांनी सकारात्मकता दर्शवत सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.