शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याची जबाबदारी जिल्हा बँकेची त्यासाठी आम्ही कटिबद्ध:मनीष दळवी

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याची जबाबदारी जिल्हा बँकेची त्यासाठी आम्ही कटिबद्ध:मनीष दळवी

*कोकण Express*

*शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याची जबाबदारी जिल्हा बँकेची त्यासाठी आम्ही कटिबद्ध:मनीष दळवी*

*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)

जिल्ह्यात दुधउत्पादना साठीची चळवळ यापुर्वी होणे अपेक्षित होती. आपल्याकडे गोकुळ येऊन बरीच वर्षे झाली गोकुळच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र नव्हेच तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील ही दूध क्रांती झाली आहे.जिल्हा बँक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील त्याची जबाबदारी जिल्हा बँकेची आहे. विकास संस्था जि.प. जिल्हा परिषद शासकीय यंत्रणा या सर्वांनी एकत्रीत मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच आपण शेतकऱ्याला समाधानकारक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनी दळवी यांनी तळवडे येथे केले.* सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते या कार्यक्रमास संचालक विद्याधर परब, सोसायटी चेअरमन आप्पा परब, प्रमोद गावडे, रवी परब, श्री.प्रज्ञा परब बाळा जाधव, माजी सभापती प्रियंका गावडे, गोकुळचे श्री. किल्लेदार, डॉक्टर रेडकर, जिल्हा समन्वयक सिद्धेश पवार बँक अधिकारी मंदार चव्हाण.आदी मान्यवर तसेच सावंतवाडी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पुढे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून दळवी म्हणाले आपला कोकणी माणूस आपल्याच काही प्रश्नाभोवती स्वतःहून फिरत राहिलाय परंतु त्या प्रश्नांमधून मार्ग शोधला पाहिजे आणि ते मार्ग शोधून पुढे जाण्याची भूमिका घेतली पाहिजे. जी घेणे आवश्यक आहे ती घेण्यामध्ये विकास संस्था जिल्हा परिषद शासकीय यंत्रणा या सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे आपल्या जिल्ह्यात दूध संकलन विकास संस्था मार्फत व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून तुमच्या घराच्या आजूबाजूच्या दोन-तीन किलोमीटर परिसरात परिसरात दूध संकलन केंद्र असले पाहिजे दूध घालण्यासाठी खर्च होता नाही दूध संकलन केंद्रातील दुधाचं उत्पादन व संकलन वाढलं पाहिजे यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकतंच रोख स्वरूपात बोनस वाटप करण्यात आलं. तुम्ही घातलेल्या दुधाचे बिल तुम्हाला मिळत आहेत.मात्र गोकुळच्या माध्यमातून जो बोनस येत आहे तो खाली शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे. यासाठी आम्ही आग्रही आहोत. तसेच दूध संस्थांकडे संगणककीय यंत्रणा असावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन असे शेवटी मनीष दळवी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!