*कोकण Express*
*उद्योग मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम*
*रत्नागिरी ः प्रतिनिधी*
राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 13 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 03.30 वाजता अलिबाग येथून मोटारीने चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सांयकाळी 07.00 वाजता चिपळूण येथे आगमन व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी परिसर पाहणी. सांयकाळी 07.15 वाजता चिपळूण नगरपरिषदेचे इंदिरा गांधी सांस्कृतिक इमारतीची पाहणी. सांयकाळी 07.30 वाजता कै. खेडेकर क्रिडा संकुल इमारतीमध्ये बॅडमिंटन कोर्ट पाहणी. सायंकाळी 07.45 वाजता कोळकेवाडी धरणातून चिपळूण शहराला ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करण्याच्या योजनेबाबत (स्थळ: शासकिय विश्रामगृह, चिपळूण).
रात्रौ 08.00 नंतर सोईनुसार चिपळूण येथून मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण. रात्रौ सोईनुसार निवासस्थान, पाली, ता. जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
शुक्रवार 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08.00 वाजता राखीव (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह अंतर्गत बुटकॅम्प व रोजगार मेळावा (स्थळ : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी) सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन व विकास समिती रत्नागिरी बैठक. (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी)
दुपारी 01.00 वाजता डोंगरी विकास समिती बैठक (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी) दुपारी 02.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी). दुपारी 02.30 ते 03.00 वाजता राखीव