शेतकऱ्यांच्या भात विक्री नोंदणीचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतला आढावा

शेतकऱ्यांच्या भात विक्री नोंदणीचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतला आढावा

*कोकण Express*

*शेतकऱ्यांच्या भात विक्री नोंदणीचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतला आढावा*

*मालवण ः प्रतिनिधी*

राज्य शासनाच्या आधारभूत किंमत भात खरेदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाने शासकीय खरेदी केंद्रावर भात विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. मालवण तालुका खरेदी विक्री संघ केंद्रावर सुरू असलेल्या या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी घेतला.

दरम्यान, दरम्यान शेतकऱ्यांची नोंदणी सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी डाटा ऑपरेटर संख्या वाढवणे. महसूल अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती ठेवणे. अश्या सूचना करून त्याची अंमलबजावणी बुधवार पासून करण्याबाबत सांगण्यात आले. सोबतच शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी नोंद चा आढावा घेण्यात आला.

यावेळी मालवण तहसिलदार अजय पाटणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए एस देसाई, तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष आबा हडकर, व्यवस्थापक दिनेश ढोलम यासह मंडळ अधिकारी लोबो, तलाठी, महसूल कर्मचारी व संघाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खरेदी विक्री संघाच्या सिंधू बाजार गोडाऊनची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.

धान (भात) खरेदी ही शासनाच्या ऑनलाइन पोर्टल माध्यमातून करण्यात येणार आहे. आगाऊ नोंदणी करताना चालू हंगामातील भात पीक लागवड नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावाने विक्री करायची आहे तो नोंदणीवेळी समक्ष उपस्थित आवश्यक आहेत. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून १५ ऑक्टोबर नोंदणीची अंतिम तारीख आहे. अशी माहिती देण्यात आली.

गतवर्षी मालवण तालुक्यातील १५४ शेतकऱ्यांच्या माध्यमातून १,८५० क्विंटल भात खरेदी शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. अशी माहिती मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!