*कोकण Express*
*सातरल -कासरल असरोंडी मार्गावरील शालेय बसफेऱ्या नियोजित वेळेत सोडा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली एसटी आगारातून सुटणाऱ्या सातरल -कासरल असरोंडी मार्गावरील शालेय बसफेऱ्या नियोजित वेळेत सोडण्यात याव्यात अशी मागणी कणकवली आगार व्यवस्थापक यांच्याकडे मनसे उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली.
कणकवली आगार व्यवस्थापक यांना या संदर्भात एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. पाटील यांच्यासह सातरल सरपंच प्रदीप राणे,कासरल पोलिस पाटील राजू सावंत ,अनिल सावंत, संदिप श्रावणकर व अन्य उपस्थित होते.
उपरोक्त विषयास अनुसरून माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी या प्रशालेत इ.5वी ते 10 वी चे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एस. टी. बस सेवा नियोजित वेळेत सुरू नसलेमुळे तसेच बऱ्याचवेळा बसफेऱ्या अचानक रदद केल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एस. टी. बस वेळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना 6 ते 8 किमी शाळेत चालत यावे लागते किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
सकाळी 8.15 वा. सुटणारी कणकवली ते किर्लोस, सकाळी 10.00 वा. सुटणारी कणकवली ते असगणी व सायंकाळी 4.00 वा सुटणारी कणकवली ते किर्लोस सदरच्या नियोजित वेळेत सोडणे आवश्यक आहे.
वरील बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून विद्यार्थ्यांसाठी नियोजित वेळेत बसफेऱ्या सोडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.