फोंडाघाटत पोलिसांची अवैध दारूवर कारवाई!

फोंडाघाटत पोलिसांची अवैध दारूवर कारवाई!

*कोकण Express*

*फोंडाघाटत पोलिसांची अवैध दारूवर कारवाई!*

*फोंडाघाट मध्ये 32 हजाराच्या दारूसह मुद्देमाल हस्तगत…!*

*अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांचा इशारा…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 15 हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. व यासंदर्भात संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट हवेलीनगर) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस हवालदार किरण मेथे यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत 1400/- रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली मापाच्या 07 बाटल्या, 6,400/- मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की 180 मिली मापाच्या 32 बाटल्या, 7,200/- हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी असे लेबल असलेल्या गोवा बनावटी दारुणे भरलेल्या कंपनी सिलिबंद असलेल्या 180 मिली मापाच्या 72 प्लास्टिकच्या बाटल्या, 6,100/- हायवड फाईन व्हिस्की 180 मिली मापाच्या 61 बाटल्या, 3,000/- बॉब्स लेमन ओडका 180 मिली मापाच्या 30 बाटल्या, 6,400/- रोमॅनो वोडका 180 मिली मापाच्या 32 बाटल्या,780/- गोल्डन आईस ब्लू फाईन व्हिस्की 180 मिली मापाच्या 13 बाटल्या, 1,300/- मेक डॉल नं.1रम 180 मिली मापाच्या 10 बाटल्या,15,000/-एक पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार वंजारे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!