*कोकण Express*
*ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रदिप तळेकर यांची फेरनिवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील ओसरगावचे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रदीप पुंडलीक तळेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने ओसरगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ओसरगाव येथील श्रीलिंग माऊली मंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला. ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने दिगंबर परब आणि ॲड. विलास परब यांनी प्रदिप तळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सत्कार मूर्ती प्रदीप तळेकर यांनी आपल्याला ओसरगाव गावांमध्ये अनेक पद मिळाली ती केवळ ग्रामस्थांमुळे मिळाली. माझ्यावर विश्वास आणि जबाबदारी दिली ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पाडली जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गजानन तळेकर, बबन देसाई, मंगेश आलव, दशरथ शिंदे, अशोक राणे, प्रदीप राणे, बाळा परब, नंदकुमार गावडे, बाबू कुलकर्णी, प्रभाकर सावंत, मनोज बागवे, दीनानाथ साटम, देवस्थान कमिटीचे मानकरी, ओसरगाव ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.