खेळाडूंनीही खिलाडू वृत्तीने खेळ करत क्रीडा रसिक प्रेमींची मने जिंका

*कोकण Express*

*खेळाडूंनीही खिलाडू वृत्तीने खेळ करत क्रीडा रसिक प्रेमींची मने जिंका*

*नगरसेवक सुशांत नाईक*

श्री. ब्राम्हणदेव मित्रमंडळ परबवाडी, आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा…!

*कणकवली ः प्रतिनिधी*

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओव्हआर्म क्रिकेट खेळाला विशेष महत्व आहे. त्याची युवा वर्गासह क्रिकेट प्रेमींना निश्चितच आवड आहे. श्री.ब्राम्हणदेव मित्रमंडळ परबवाडी देखील सातत्याने क्रिकेट स्पर्धा घेत असून या स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू घडावेत. खेळाडूंनीही खिलाडू वृत्तीने खेळ करत क्रीडा रसिक प्रेमींची मने जिंकावीत असे प्रतिपादन विद्यमान शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले.

श्री. ब्राम्हणदेव मित्रमंडळ परबवाडी, कणकवली आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी फित कापून केला. यावेळी संजय मालंडकर, दादा परब, बाबल परब, अनंत परब, काका परब, भिवा परब, सचिन सरगले, संतोष सावंत, बबन परब, रुपल परब, किरण परब, सोनू परब, अनंत सरगले आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाईक पुढे म्हणाले, जिल्हयातील खेळाडूंना तसेच शहरातील क्रिकेट प्रेमींना या स्पर्धेतून आनंद मिळावा. खेळाडूंना क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा. हे मंडळ क्रीडा क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक,धार्मिक क्षेत्रात काम करत असून यापूढे हि आमचे कार्य अविरत चालू रहावे अशा शुभेच्छा दिल्या.
यास्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत २० संघानी सहभाग घेतला असून या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार असून कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने नियमांचे पालन करून ही स्पर्धा घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!