*कोकण Express*
*जि. प. प्राथमिक शाळा वरवडे हिवाळवाडी येथील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना उपक्रम*
जि. प. प्राथमिक शाळा वरवडे-हिवाळवाडीला प्रसाद बांदल यांनी शासनाच्या सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली. यावेळी मुख्याध्यापिका सारिका पवार, सरपंच प्रभाकर बांदल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय कदम, समीधा बांदल, शिक्षिका शालिनी तांबे, अंगणवाडीसेविका स्मिता सावंत, महेश कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रसाद बांदल यांनी दिलेल्या आर्थिक मदतीची रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. पुढील वर्षापासून या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून शाळेतील गरजू व होतकरू मुलीस शिक्षणास आर्थिक केली जाणार आहे. आर्थिक मदत दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका पवार यांनी प्रसाद बांदल यांचे आभार मानले.