*कोकण Express*
*राणे(महाराणा) समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग ची सर्वसाधारण सभा संपन्न*
रविवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी राणे ( महाराणा) समाज उन्नती मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती.याची सुरुवात देवी माहेश्र्वरी व महाराणा प्रताप यांच्या तसबिरीला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.या सभेला मंडळाचे अध्यक्ष श्री.तुळशीदास रावराणे,श्री जयेंद्र रावराणे,मंडळाचे प्रवर्तक श्री. पांडुरंग उर्फ आप्पा राणे,हडपिड सरपंच श्री.दाजी राणे , डॉ. तुळशीराम रावराणे,श्री.संदीप राणे आदींनी मंडळाचे पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील निवृत्त झालेले पोलिस अधिकारी श्री.अनमोल रावराणे,श्री.रमेश राणे तसेच कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती श्री .मनोज रावराणे यांचा पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.सभेमध्ये मंडळाची सभासद संख्या वाढविण्यासाठी नियोजन करण्यात आले.त्यासाठी कार्यकारी मंडळाची नेमणूक करण्यात आली.या सभेचे प्रास्ताविक श्री.मंगेश राणे तर सूत्रसंचालन प्रा. श्री. सत्यवान राणे यांनी केले.या सभेसाठी कार्यकारिणी सदस्य श्री.भास्कर राणे,श्री.शेखर राणे यांनी तसेच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने राणे समाज बांधवांनी उपस्थिती दाखवली.