*कोकण Express*
*खा. सुरेश प्रभूंच्या हस्ते संजीवनी हॉस्पिटलमध्ये टेलिमेडिसीन सुविधेचा शुभारंभ*
*ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचे चे मिळणार अल्पदरात उपचार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
खा.सुरेश प्रभू यांच्या हस्ते कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमधील टेलिमेडिसीन , सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल मधील मोस्ट सिनियर असलेले तज्ञ डॉक्टर टेलिमेडिसीन द्वारे सिंधुदुर्गातील रुग्णांना किडनी, जठर, लिव्हर, संधिवात अशा गंभीर आजारांवर वैद्यकीय चिकित्सा करून उपचार देणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने टेलिमेडिसीन सुविधा हा जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे उदगार खासदार सुरेश प्रभू यांनी उदघाटन प्रसंगी काढले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ.विद्याधर तायशेटे, डॉ.मेघा तायशेटे, डॉ.अमेय देसाई, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रोटरीयन दीपक बेलवलकर, नगरसेविका मेघा गांगण, डॉ. सुहास पावसकर, नकुल पार्सेकर, व्ही.के.सावंत, सी ए सुहास पालव, ऍड.राजेश परुळेकर, रवींद्र मुसळे आदी उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी ज्युपिटर हॉस्पिटलचे किडनी तज्ञ डॉ निवृत्ती हसे , डॉ. अनिकेत हसे, लिव्हर तज्ञ डॉ. प्राजक्त गुप्ते , संधिवात तज्ञ डॉ. योगिता पेंडुरकर , आतडी तज्ञ , डॉ. मुक्ता बापट यांच्याशी झूम मिटिंगद्वारे झालेल्या चर्चेवेळी ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा सिंधुदुर्गातील रुग्णांना दिली जाणार असल्याचे डॉ. यांनी सांगितले. भौतिक सुविधांसोबत उत्तम आरोग्य हेही महत्वाचे आहे. प्रकृती उत्तम राखण्यासाठी योग्य वैद्यकीय उपचार तेवढेच महत्वाचे ठरतात.त्यामुळे टेलिमेडिसीन द्वारे सिंधुदुर्ग वासीयांना सुपरस्पेशालिटी ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा अगदी नाममात्र शुल्कात उपलब्ध होणार आहे. याचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुदृढ राखावे असे आवाहनही खा. सुरेश प्रभू यांनी केले.