कणकवलीत मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद निमित्त सरबत वाटप

कणकवलीत मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद निमित्त सरबत वाटप

*कोकण Express*

*कणकवलीत मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद निमित्त सरबत वाटप*

*सकल मराठा समाजाने दिल्या शुभेच्छा.!*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

कणकवली येथे जशने ईद-ए-मिलाद उन नबी मुबारक म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी कणकवली पटवर्धन चौक येथे कणकवली तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुसंख्य मुस्लिम बांधव व मराठा बांधव उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांच्या वतीने आसिफ नाईक यांनी मोहम्मद पैगंबर यांनी समाजासाठी मानवतेची शांततेची व एकात्मतेची शिकवण दिली या शिकवणीला अनुसरून आपण मुस्लिम बांधव मार्ग क्रमांक करत आहोत यापुढे देखील विधायक सामाजिक हिताची कामे आपण चालू ठेवू असे नाईक यांनी सांगितले.

तसेच एडवोकेट रईस पटेल यांनी मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली शिकवण ही आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे त्यांनी समाजामध्ये ऐक्य टिकवावे एकोपा टिकून शांतीचा संदेश दिला त्यांचा आज जन्मदिवस त्यांचं कार्य आपण पुढे असे चालू ठेवणार असे सांगितले यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने एस टी सावंत यांनी देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मराठा समाजाच्या मेळावा मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांनी सरबत आणि पाणी वाटप करून मोठे सहकार्य केले त्यामुळे आपण सर्वच समाज एकत्र राहून शांतता टिकवणे व एकत्र राहणे यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत अशाच पद्धतीने लोकहिताचे वेगवेगळे उपक्रम आपण साजरे करूया असे सांगत त्यांनी मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी सोनू सावंत भाई परब एस एस सकपाळ, महेंद्र सामरेकर ,महेंद्र गावकर ,बच्चू प्रभूगावकर ,सुशील सावंत, सूशांत दळवी, संतोष राऊळ तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने मुराद अली शेख,निसार शेख,आसिफ नाईक ,शानू शाह,निसार काज़ी,आज़ीम कुदालकर् ,सलाम पटेल ,सरफराज शेख,असलम निशानदार,एड रईस पटेल,एड अशपाक् शेख,चांदसाब शेख,शदाब् शेख ,गुलाब खान,सादिक कुदालकर,मुदद्सर मुकादम् शफीक अलगुर,आसिफ पटेल,असलम धारवाडकर् आसिफ निशानदार,बशीर कुरेशी,जाकिर हुडली,शारुख पटेल ,मुन्ना शेख,अब्दुल उड़ियान् यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!