*कोकण Express*
*…तर क्रीडा स्पर्धा आयोजनावर बहिष्कार!: शाम भोसले*
*विनाअनुदानित ४२ क्रीडा प्रकारांच्या गुणांकनांकासाठी आग्रही!*
*कासार्डे: संजय भोसले*
क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन २०२२ – २३ या वर्षात आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेतील सन- २०१३ वर्षात विना अनुदान व विनागुणांकन अटीवर मान्यता दिलेल्या क्रीडा प्रकारांचा समावेशन केले होते. या क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण देण्यात यावे याकरीता सन २०२१ रोजी क्रीडा आयुक्त यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई येथे शिफारस केली असून सन २०२२ – २३ मध्ये आयोजीत क्रीडा स्पर्धेत नियम अटी मध्ये ४४ क्रीडा प्रकारांना क्रीडा गुणाकांनपासून वंचित ठेवले आहे.
क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण मिळावे याकरीता शालेय खेळ – क्रीडा बचाव समिती महाराष्ट्र राज्यात सतत शासनस्तरावर प्रयत्न करीत आहे. स्पर्धा आयोजना पुर्वी क्रीडा आयुक्त व संबंधित क्रीडा अधिकारी यांचे समवेत बैठकीचे आयोजन करावे यासाठी पत्रव्यवहार करून ही क्रीडा व युवक सेवा महा.राज्या यांनी समक्ष बैठक आयोजन न करता २९.९.२०२२ कोणती पुर्व कल्पना न देता ऑनलाईन मिटींग जाहिर केली ,यामुळे क्रीडा संघटक यांना अंधारात ठेवून एकतर्फी हुकुमशाही चालत असल्याचे निदर्शानास आल्यामुळे शालेय खेळ क्रीडा बचाव समिती यांनी ऑनलाईन बैठकीवर बहिष्कार घालून क्रीडा गुण बाबत क्रीडा व शिक्षण विभागाने निर्णय घेवून सर्व क्रीडा संघटकांची श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी ,पुणे येथे ऑफलाईन बैठक घ्यावी आणि राज्यातील सुमारे सात हजार प्रशिक्षक व चार लाखांपेक्षा अधिक खेळाडुं न्याय द्यावा अशी मागणी शालेय खेळ – क्रीडा समिती अध्यक्ष शाम भोसले यांनी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन म्हटलं आहे.