*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा – घोणसरी मुख्य रस्त्यासाठी १ कोटी ९५ लाख निधी मंजूर*
*मा. सभापती मनोज रावराणे, घोणसरी सरपंच मृणाल पारकर यांनी मानले आ.नितेश राणे यांचे आभार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा – घोणसरी मुख्य रस्त्यासाठी १कोटी ९५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून घोणसरीसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची, वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे. फोंडा – घोणसरी मुख्य रस्ता मंजूर व्हावा यासाठी वारंवार घोणसरी ग्रामस्थ अनेक वर्षे मागणी करीत होते.
गेली २५ वर्षे या रस्त्याची कोणतीही डागडुजी झाली नसून रस्त्यावरून चालणे ही अत्यंत कठीण असल्याने रस्ता नूतनीकरणासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२२-२३ योजनेअंतर्गत १ कोटी ९५ लाख निधी मंजूर करून दिला. त्यामुळे वर्षानुवर्षे मागणी असलेला फोंडा – घोणसरी रस्ता नवीन होणार असून ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे माजी सभापती तथा घोणसरी पंचायत समितीचे सदस्य मनोज रावराणे, घोणसरी सरपंच मृणाल पारकर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष छोटू पारकर, तसेच घोणसरी ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आभार मानले.