*कोकण Express*
*असलदे गावचे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांना आदर्श सरपंच गौरव पुरस्कार*
*नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा मिळाला पुरस्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारत सरकार आणि कर्नाटक राज्य सरकार REG अंतर्गत अशासकीय संस्था (N.G.O.)नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) बेलागावी हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी, बेलागावी आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे पार पडला.कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातील १२० आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून असलदे गावचे सरपंच गुरुप्रसाद गणपत वायंगणकर यांना आदर्श सरपंच गौरव पुरस्कार गोवा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी अंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूर माजी महापौर राजू शिंगाडे, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावर, विलासराव पाटील, आमदार निलेश लंके, डॉ .पवन शर्मा,शेख,मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक व शैक्षणिक शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निःस्वार्थी व भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केलेबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती, बेळगाव तर्फे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील निवडक व्यक्तिमध्ये निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी असलदे उपसरपंच संतोष परब,मधुकर परब,तुकाराम तूपट,ग्रामसेवक आर डी.सावंत आदी उपस्थित आहे.